पर्यटन वृद्धीसाठी समुद्रकिनारी जाण्यास रस्ता मिळावा !

आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुजा तेंडोलकर यांची सीएमकडे मागणी

ब्युरो न्यूज । वेंगुर्ले : येथील भारताची तशीच एशियाचीही स्ट्रॉग वुमन, हॉटेल व्यावसायिक, बागायतदार, कलाकार, चित्रकार, सुप्रसिद्ध लेखिका अनुजा तेंडोलकर यांनी त्यांच्या समुद्रकिनारी असलेल्या जागेत जाण्यासाठी रस्ता मिळावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
श्रीमती तेंडोलकर मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, मी वेंगुर्ले येथीलआंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग विजेती आहे. १९ आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट आहे. २०१८ सालात माझा एशियन रेकॉर्डडी आहे. मी भारताची तशीच एशियाचीही स्ट्रॉग वुमन आहे. हॉटेल व्यावसायिक, बागायतदार, कलाकार, चित्रकार, सुप्रसिद्ध लेखिका आहे. ‘पोलादी ‘ हे माझे आत्मचरित्र नुकतेच प्रसिध्य झाले आहे.
मी माझ्या जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सतत प्रयत्न करत आहे. माझी समुद्रकिनारी जमीन आहे. (समुद्रकिनारी टेकडी आहे) उभादांडा, मुठ आणि मोचेमाड या गावाच्या सरहद्दीवर हि जागा आहे. त्या प्लॉटवर जाण्यासाठी मला प्लॉटच्या वरून व समुद्रकिनारी टेकडीच्या पायथ्याशी जाण्यासाठी गाडी रस्ता नाही. आज सोळा वर्षे मी वाट पाहिली उभादांडा येथील बंधाराही अपूर्ण आहे. मी एक हॉटेल व्यावसायिक आहे. तारकली येथे चिंतामणी रिसोर्ट’ आहे. वेंगुर्ले येथे पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असूनही रस्त्या अभावी ते शक्य नाही. तरी कृपया माझ्या विनंतीचा मान राखून रस्ता देण्यात यावा हि नम्र विनंती आहे. असे अनुजा तेंडोलकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, वेंगुर्ले.

error: Content is protected !!