कट्ट्यातील मासळी मार्केटचे दरवाजे अखेर उघडलेतीन वर्षांपासून उन्हा-पावसात बसणाऱ्या मासे विक्रेत्यांना शेवटी न्याय मिळाला.: कोकण नाऊ इफेक्ट
मालवण/प्रतिनिधी
मालवण. तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील मच्छी मार्केटची इमारत निर्लेखित केल्यापासून मागील तीन वर्षे मासळी विक्रेते उघड्यावर बसून आपला व्यवसाय करीत होते. अपूर्णावस्थेत असलेल्या मच्छी मार्केटच्या इमारतीच्या शटरला मागील दीड वर्षांपासून टाळे होते.
याबाबत स्थानिक राहिवासी श्री. आनंद रावले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला होता.कोकण. ना ऊ ने. यावर. सर्व प्रथम प्रकाश टाकला होता
आनंद रावले एड. गीता. काळे
यांची निर्णायक सकारात्मक भूमिका व नागरिकात. उमटलेल्या. प्रतिक्रिया यामुळे अखेर ग्रामपंचायत वरची गुरामवाडी खडबडून जागी झाली. उर्वरित प्रलंबित कामे तडकाफडकी पूर्ण केली गेली आणि शेवटी मच्छी विक्रेत्यांना त्यांचा हक्काचा निवारा मिळाला. याकामी स्थानिक राहिवासी ऍड. गीता काळे यांनी तक्रारदार व मच्छी विक्रेते यांच्या वतीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
तीन वर्षाने का होईना इमारतीचे काम पूर्ण झाल्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.




