माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत यांच्या वतीने मोफत शिलाई मशीनचे वाटप

आमदार नितेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य
कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्यावतीने स्वखर्चाने एकुलता एक मुलगा अपंग असलेल्या वयोवृध्द रत्नप्रभा अभिमन्यू सावंत यांना उदरनिर्वाह करण्यासाठी शिलाई मशीन देण्यात आली.
आज कनेडी बाजारपेठ येथील विभागीय कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात संजना सावंत,माजी अध्यक्षा, यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आली.यावेळी, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, सांगवे सरपंच श्री.संजय सावंत, सुरेश ढवळ, नाटळ सरपंच श्री.सुनिल घाडीगांवकर,गांधीनगर सरपंच श्री.मंगेश बोभाटे, दारिस्ते उपसरपंच श्री.संजय सावंत,माजी सरपंच श्री.महेंद्र सावंत, अशोक कांबळे, नितीन गांवकर, अजित तांबे, सौ.मयुरी मुंज, सौ.राजश्री पवार,श्री.राॅबर्ट डिसोजा, दिपक नांदगांकर, राजेश सापळे, आणि नाटळ आणि हरकुळ मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी




