युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांचा महान ग्रामपंचायतीस 28 जुन रोजी उपोषणाचा इशारा

सरपंच ग्रामपंचायत महान यांचा मनमानी कारभार
बीएसएनएल द्वारे प्रस्तावित असलेल्या 4 जी टॅवर संदर्भात युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांनी 21-04-2023 रोजी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता सदर अर्जास 50 दिवसाचा कालावधी उलटुनही सरपंच ग्रामपंचायत महान यांच्या कडुन गावहीताचे काम होत असताना ना-हरकत दाखला देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. सदर प्रश्न ग्रामसभेत विचारला असता सरपंच यांच्याकडुन कोणतेही उत्तर देण्यात आले नाही तसेच महान ग्रामपंचायतीच्या अन्य ग्रामपंचायत सदस्यांनीही मासिक सभेत प्रश्न विचारूनही सरपंच यांनी टाळाटळ केली आहे .
सदर प्रश्न गावहीताचा असल्याने युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांनी 27 जुन पर्यंत दाखला न दिल्यास 28 जुन रोजी ग्रामपंचायत कार्यालय महान समोर उपोषणाचा ईशारा दिला आहे