आचरे भागात विजेचा लपंडाव सुरु

आचरा– अर्जुन बापर्डेकर
पावसाच्या वातावरणानेच आचरा गावात मंगळवार पासून विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांसोबत व्यापारयांनाही याचा फटका बसत आहे. यामुळे तातडीने विद्यूत पुरवठा सुरळीत झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा व्यापारी बांधवांनी दिला आहे.
मंगळवार पासून आचरा भागात पावूस पडला नसलातरी अधूनमधून पावसाळी ढग दाटून येत पावसाळी वातावरण बनत आहे. मात्र नुसत्या पावसाळी वातावरणानेच विजेचा लपंडाव सुरु झाल्याने पावसाळ्यात वीज समस्या आणखीन उग्र बनण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. सध्या सुरु असलेल्या वीजेच्या लपंडावामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसत आहे.यामुळे संताप व्यक्त केला जात असून विद्यूत समस्या तातडीने दूर न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.