दुग्ध.सहकार विभागातून अखेर ६ वर्षानंतर श्री. धुमाळसाहेब यांची बदली….

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा दुग्धव्यवसाय विकास खात्यातील(पदुम) दुग्ध.मत्स्य.सहकारी संस्थांचे उत्कृष्ट कामकाज पाहणारे सहकारी अधिकारी श्री.एम.एस.धुमाळ साहेब यांची अखेर 6 वर्षानंतर त्यांच्या मूळ सिंधुदुर्ग जिल्हा सहकार खात्याकडे बदली झाली आहे.
श्री.धुमाळ साहेब हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असून त्यांनी दुग्ध सहकारी संस्था,मत्स्य सहकारी संस्था व इतर संस्थांचे कामकाज हाताळताना सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला.तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकरी,पदाधिकारी यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली.विहित मुदतीमध्ये माहिती गोळा करताना योग्य मार्गदर्शन करून संस्था कशा चालू ठेवता येतील याकडे विशेष लक्ष पुरविले.
अतिशय शांत आणि हुशार व्यक्तिमत्व असलेल्या श्री.धुमाळसाहेब यांनी दुग्ध व मत्स्य सहकारी संस्थांच्या नोंदणी बरोबरच संस्थांच्या निवडणुका घेणे,बंद संस्था अवसायनात घेणे,संस्थांचे सर्वेक्षण आणि संस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे वगैरे कामे चोख पार पाडली.यापूर्वी त्यांनी सावंतवाडी व देवगड तालुक्यात सुद्धा चांगले काम केले आहे.दुग्ध.मत्स्य सहकार विभागातील कामकाजाची त्यांनी व्यवस्थित घडी बसवून दिली आहे.त्यांच्यासारखा तळमळीने काम करणारा अधिकारी जिल्ह्याला लाभल्याबध्दल अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्हा सहकार विभागातील सौ.सुमती ढवण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!