वागदे सरपंचांच्या संकल्पनेतून 25 महिलांना पुरस्कार देत सन्मान

वागदे सरपंचांचा जिल्ह्यात अनोखा उपक्रम

विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचा केला गौरव

ग्रामपंचायत वागदे मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी आज करण्यात आली. त्या निमित्ताने वागदे ग्रामपंचायत च्या माध्यमातून.गावातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम.बचत गटाच्या माध्यमातून महिलाना मदत करणे, कोरोना कालावधीत मदत केलेल्या महिलांना आंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, अशा कर्तबगार महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 25 महिलांचा पुरस्कार देत सत्कार वागदे ग्रामपंचायत वतीने सरपंच संदीप रमाकांत सावंत, उपसरपंच सौ शामल गावडे, ग्रामसेवक युवराज बोराडे सदस्य, दीपक कदम, नीलम पालव, संजना गावडे, सुनील गोसावी, सुप्रिया काणेकर, सुनिधी आर्डेकर, मुख्य सेविका शर्मिला वळवी, सर्वांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, रोख स्वरूपात रक्कम, सन्मानित करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देत असताना याबरोबर उत्कृष्ट काम केलेल्या अन्य महिलांचा देखील गौरव करण्याची संकल्पना श्री सावंत यांनी अमलात आणली व त्यांचा गौरव केला. सौ अस्मिता परब, सौ नैना गावडे,. सिया गावडे, दीपिका गावडे, साक्षी गोसावी, अमिता घाडीगावकर, प्रगती गावडे, संगीता गावडे, विशाखा परब शर्मिला घाडीगावकर, पायल पाताडे, सुमन घाडीगावकर, रेश्मा गावडे, रीमा हिर्लेकर, अर्चना तेंडुलकर, पुष्पांजली कदम, सुनीता घाडी, राजश्री सरंगले, विमल गोसावी, लीना गोसावी, मेघना घाडीगावकर, श्रद्धा गावडे, सर्वांना सन्मानित करण्यात आले.सूत्रसंचालन श्री सुनील पालव यांनी केले. सर्व महिलांनी ग्रामपंचायत वागदे चे आभार मानले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!