उद्यापासून मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वर “मालवण महोत्सव 2023”

कोकण नाऊ चॅनेल चे आयोजन.

मालवण (प्रतिनिधी):

कोकण नाऊ आयोजित मालवण महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मालवण वासियांना अनुभवायला मिळणार आहे. हा महोत्सव 25 मे ते 31 मे या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर होणार आहे. खाद्य महोत्सव आणि घरगुती वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री याबरोबरच ऑटो एक्स्पो मनोरंजन जत्रा असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे.
या महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते खालील प्रमाणे असणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 25 मे 2023 रोजी रात्री नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यादरम्यान ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले आहे. 26 मे ला संध्याकाळी सहा वाजता वेशभूषा स्पर्धा होणार आहे. या वेशभूषा स्पर्धेत छोटा गट व मोठा गट असे दोन गट पाडण्यात आले आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षीस व भेटवस्तू देण्यात येणार आहे 26 मे ला संध्याकाळी साडेसात वाजता भव्य खुली ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पाच हजार रुपये व आकर्षक चषक आणि सन्मानपत्र, द्वितीय विजेत्यास तीन हजार रुपये आकर्षक चषक व सन्मानपत्र व तृतीय विजेत्या संघास दोन हजार रुपये सन्मानपत्र व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.27 मे ला संध्याकाळी सात वाजता गीत गाता चल ही संगीतमैफल आयोजित करण्यात आले आहे. संचालक दीनानाथ मीशाळ यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथील गायक या स्पर्धेत सहभागी होतील. तर संध्याकाळी साडेसात वाजता कराओके गायन स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेत प्रथम विजेत्याला 2000 रुपये,द्वितीय विजेत्याला 1500 रुपये व तृतीय विजेत्याला 1000 रुपये अशी पारितोषिक सन्मानपत्र व चषक देण्यात येणार आहेत. 28 मे ला संध्याकाळी सात वाजता खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम मालवणवासीयांना अनुभवता येणारे विशेष म्हणजे मालवण शहरात प्रथमच संगीत वाद्यांच्या साथीने हा कार्यक्रम होणार असून या स्पर्धेतील विजेत्याला मानाची पैठणी बहाल करण्यात येणार आहेत.याबरोबरच आकर्षक बक्षीस व भेटवस्तू देण्यात येणार आहेत.29 मे ला एकेरी खुली नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.संध्याकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल बारा वर्षाखालील लहान गट व बारा वर्षांवरील मोठा गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होईल. बारा वर्षाखालील लहान गटातील प्रथम विजेत्याला दोन हजार रुपये द्वितीय विजेत्याला दीड हजार रुपये तृतीय विजेत्याला एक हजार रुपये तर बारा वर्षावरील मोठ्या गटातील विजेत्यांना प्रथम 3000 द्वितीय 2000 व तृतीय 1000 अशी बक्षीस दिली जातील. याबरोबरच आकर्षक चषक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहेत.30 मे ला संध्याकाळी सात वाजता खुली लावणी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला तीन हजार रुपये द्वितीय विजेत्याला दोन हजार रुपये व तृतीय विजेत्याला 1000 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता जादूचे प्रयोग हा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे.31 मे हा या महोत्सवाचा अखेरचा दिवस असून या दिवशी “कोकण नाऊ सुंदरी” पर्व दुसरे ही फॅशन शो स्पर्धा विशेष कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पाच हजार रुपये,द्वितीय विजेत्याला तीन हजार रुपये व तृतीय विजेत्याला दोन हजार रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. हा संपूर्ण महोत्सव रंगतदार होण्यासाठी आयोजक मेहनत घेत आहे.कोकण नाऊ चॅनेल ने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी 9370440893,9422434260 यां संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हाहन कोकण नाऊ च्या संचालिका वैशाली गावकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!