सुशांत नाईक यांची राजकीय वळवळ म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट!

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा टोला

नितेश राणेंवर लक्ष देण्यापेक्षा पराभव होणाऱ्या भावावर लक्ष केंद्रित करा

कणकवली चे माजी नगरसेवक सुशांत नाईक हे वार्डापुरते लिमिटेड राजकारणी म्हणून ओळखीचे आहेत. आमदार नितेश राणे यांचा महाराष्ट्र राज्यात दबदबा आहे व तो राज्याने व सिंधुदुर्ग जिल्ह्याने देखील बघितला आहे. यातूनच राणे कुटुंबीया बद्दल असलेली प्रचंड पोट दुखी हेच नाईक यांच्या बोलण्याचे कारण असल्याचा टोला माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला आहे.
नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघात केलेला विकास आणि आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मध्ये केलेला विकास या जमीन अस्मानाचा फरक आहे.
कुडाळ मतदार संघात शासकीय अधिकारी आमदार वैभव नाईक यांना फाट्यावर मारतात.म्हणूनच वैभव नाईक यांना आपल्याच मतदारसंघातील अधिकाऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे कराव्या लागतात.
प्रशासन हे सुषेगात असल्यामुळेच आमदार नितेश राणे यांनी महसूल विभागाला आकस्मिक भेट देत आढावा घेतला.
सुशांत नाईक यांचे बंधू वैभव नाईक यांनी फक्त आपल्या वैयक्तिक स्वतःच्या कामांसाठीच व व्यापारासाठी शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. त्यामुळे सुशांत नाईक यांचीही वळवळ म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा टोला श्री. परुळेकर यांनी लगावला आहे. वैभव नाईक आमदार म्हणून कमी पडत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना निवेदन देण्याची वेळ येते. घोटगे सोनवडे घाटाच्या संदर्भात काम पूर्ण होऊ शकले नाही त्यावेळी आमदार नाईक यानी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याचा देखील त्यांनी विचार करावा. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून माजी खासदार निलेश राणे हेच निवडून येणार आहेत. सुशांत नाईक यांचे बंधू वैभव नाईक यांचा पराभव नक्की होणार आहे. त्यामुळे सुशांत नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या भावाचा पराभव कसा वाचवता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे असा टोला श्री परुळेकर यांनी लगावला आहे.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!