मंगळवारी कणकवलीत बारसू रिफायनरी बाबत महत्वाची बैठक

कणकवली : बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असताना त्याच्या बऱ्या वाईट परिणामांची शास्त्रीय पायावर चर्चा न करता, लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न देता, पोलीस बळाच्या आधारे लोकशाही पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने सुरु असलेले रिफायनरी विरोधी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न शासनाचा सुरु आहे. या विरोधात मंगळवार 16 मे रोजी कणकवलीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बारसू रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून आणि विरोध करणाऱ्या स्त्री पुरुष आंदोलकांवर अत्यंत क्रूरपणे लाठीचार्ज करून शासन अमानुष व्यवहार करून हे आंदोलन दडपून टाकू पाहत आहे. याविरोधात चर्चा करण्यासाठी मंगळवार दि 16 मे 2023 रोजी कणकवली येथे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या संघटना व कार्यकर्ते लेखक कवी कलावंत आणि बारसू रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे प्रतिनिधी यांची व्यापक. अशी ही बैठक डॉ भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत आयोजित. करण्यात आली आहे. अशी माहिती संपत देसाई यांनी दिली आहे.
या बैठकीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.
म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालय, टेम्बवाडी कणकवली येथे मंगळवार दि 16 मे 2023 सकाळी ठीक 11.00 वाजता ही बैठक आहे