कांदळगांव सम्राटअशोक नगर येथील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल अजय सावंत प्रथम

सिद्धार्थ विकास मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ कांदळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने *तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंत्युस्तव कार्यक्रमामध्ये (buddhist festival ) मध्ये जिल्हाभरातुन नामवंत 24 स्पर्धकांनी सहभाग घेतला. चुरशीच्या या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत *प्रथम क्रमांक मृणाल अजय सावंत (पिंगुळी ,कुडाळ ) हिने मिळवला.
तिला प्रथम क्रमांकासाठी रोख 7132 रु व चषक संदीप लहु कदम यांजकडून संजय भगवान कदम व गितेश लहु कदम यांच्या स्मरणार्थ देण्यात आले . रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील सर्व आकर्षक चषक वैशाली गंगाराम कदम / गायकवाड हिजकडून अजय गंगाराम कदम यांच्या स्मरणार्थ देण्यात आले.
द्वितिय क्रमांकाचे बक्षिस समर्थ गवंडी (रेडी ) यांना रोख 5132 रु व चषक गंगाधर भिमराव कदम यांजकडून आईवडीलांच्या स्मरणार्थ देण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस नेहा जाधव (कुडाळ ) यांना रोख 3132 रु व चषक निमिष नारायण कदम यांजकडुन त्यांचे वडील नारायण विठोबा कदम व निलेश कदम यांच्या स्मरणार्थ देण्यात आले . स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक विश्लेषा मंडलिक (मालवण ) हिला रोख 1632 रु व चषक सन्मय व विराजस उदय कदम यांजकडून देण्यात आले . दुसरे उत्तेजणार्थ बक्षीस पुर्वा मेस्त्री हिने मिळवले तिला रोख 1632 रु व चषक नितिन कल्याण कदम यांजकडून देण्यात आले . स्पर्धेचे पंच म्हणुन सिध्देश पालव आणि यशश्री वरक यांनी काम पाहिले . रेकॉर्ड डान्स बक्षिस वितरण समारंभास सिद्धार्थ विकास मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कदम , समाजभुषण संदीप कदम ,विद्याधर कदम , कल्याण कदम , लहु कदम , नितिन कदम ,माजी अध्यक्ष गंगाधर कदम , विकास कदम ,संदेश कदम , अभिमन्यु कदम ,निमिष कदम , उदय कदम, प्रमोद कदम ,कांचनमाला कदम , अनघा कदम , वैभव कदम,निलिमा कदम ,मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम उपस्थित होते.