द केरला स्टोरी च्या माध्यमातून वस्तुस्थिती महिला पालकांपर्यंत पोहोचण्याची गरज

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून द केरला स्टोरी चित्रपटाचे महिलांकरता मोफत आयोजन
सध्या देशामध्ये घडत असलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणांवर आधारीत बहुचर्चीत “द केरला स्टोरी” हा सिनेमा वास्तवदर्शी असून प्रत्येक महिला पालकांना पाहाता यावा यासाठी आज या विशेष शो चे आयोजन करण्यात आल्या ची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. जास्तीत जास्त महिलांनी हा सिनेमा पाहणे अत्यंत जरूरीचे आहे. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी शनिवारी केले होते. आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून महिलांना मोफत सिनेमा पाहण्यासाठी रविवारी लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे दुपारी १२.३० वाजता द केरला स्टोरी हा शो मोफत दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
आमदार नितेश राणे यांनी स्वतः लक्ष्मी चित्रमंदिर येथे जात मोजक्या शब्दात मार्गदर्शन करून शो ची सुरुवात करून दिली. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत, संजना सदडेकर, प्राची कर्पे, प्रतीक्षा सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी