पाण्याच्या टाकीत पडलेल्या बैलाला जीवदान

आचरा– अर्जुन बापर्डेकर
सोमवारी दुपारी चिंदर सडेवाडी येथील सिमेंट लादी व्यावसायिकांने बांधलेल्या टाकीमध्ये पडलेल्या बैलाला प्राणीमित्रांनी जीवदान दिले
चिंदर सडेवाडी येथील सिमेंट लादी व्यावसायिकांने बांधलेल्या टाकीमध्ये सोमवारी दुपारी बैल पडला होता. काहीतरी आवाज येतोय हे लक्षात आल्यावर शेजारील विशाल गोलतकर यांनी धाव घेत त्याला काठी व दोरीचा आधार दिला .त्यांनी गांभीर्य ओळखून प्राणीमित्र, शेजारील व्यक्तींना बोलवले. यावेळी प्राणीमित्र स्वप्निल गोसावी, समीर कांबळी, दिपक गोसावी, किरण सावंत आदींनी अथक प्रयत्नांनी बैलाला वर काढण्यात यश आले.





