सासोली हेदूस येथील प्रदीप परब आणि दत्ताराम पार्सेकर यांचे उपोषण सुरु
दोडामार्ग : सासोलीतून वेंगुर्लेकडे नेल्या जाणाऱ्या जलवाहिनीचे काम आपल्याला विश्वासात न घेता सुरु असल्याचे कारण देत सासोली हेदूस येथील प्रदीप परब आणि दत्ताराम पार्सेकर यांच्या कुटुंबीयांनी ज्या रस्त्यातून जलवाहिनी नेण्यात येणार आहे त्याच रस्त्यावर उपोषण सुरू केले आहे.
तो रस्ता जीवन प्राधिकरणच्या उपसा विहीर आणि मोटार पंप गृहाकडे जातो.रस्ता ८०० मीटर आहे.त्यापैकी ५०० मीटर रस्त्यात जलवाहिनी (पाईप) टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे तर ३०० मीटर रस्त्यात पाईप टाकण्याचे काम सुरु झाले होते.संबंधित उपोषणकर्त्यांची घरे त्या रस्त्यालगत आहेत. त्यांनी त्याच रस्त्यात आजपासून उपोषण सुरू केले आहे.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / दोडामार्ग