ट्रकला तारा अडकून विद्युत पुरवठा ठप्प
कणकवली तेली आळी येथील घटना
कणकवली शहरातील तेली आळी येथे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला रस्त्यांच्या वरील सर्विस वायर व अन्य तारा लागल्याने या ठिकाणचा पोल मोडून पडला. व काही भागातील तारा देखील तुटल्या. यामुळे कणकवली तेली आळी, हर्णे आळी येथील विद्युत पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
कणकवली/ प्रतिनिधी