फोंडाघाट गावातील मंदिरात भेदभाव संपवा

शुभांगी पवार यांचे कणकवली तहसीलदार यांना निवेदन

फोंडाघाट गावातील मंदिरात अनुसूचित जातींवर चालू असलेला भेदभाव संपवा असे निवेदन फोंडाघाट सरपंच याना सात महिन्यापूर्वी दिले होते. परंतु त्यावर कोणताही निर्णय झाल्याची आम्हाला माहिती आजपर्यंत मिळाली नाही. याची चौकशी करता हा अन्याय आजही चालू आहे असे कळते. गावातील सवर्ण लोक प्रबळ असल्याने अनुसूचित जातीचे लोक याबद्दल तक्रार करायला घाबरत आहेत.

तरी या प्रकरणाची माहिती घेऊन फोंडाघाट गावातील मंदिरातील जातीभेद संपवावा असे निवेदन कणकवली येथील शुभांगी पवार यांनी आज कणकवली तहसीलदार आर जे पवार यांना दिले आहे. फोंडाघाट हे गाव नसून मोठी बाजारपेठ आहे. या गावाने हा अन्याय बंद करून सर्व जिल्ह्यातील गावांना मार्ग दाखवावा असे शुभांगी पवार यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!