पक्षाध्यक्ष म्हणून राजीनामा देण्याचा पवार साहेबांचा निर्णय मनाला दुःख देणारा!

लवकरच मुंबईत भेट घेत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना पोहचवणार
राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांची माहिती
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदापासून निवृत्तीचा घेण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत वेदनादायी आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यापासून त्यांच्यासोबत काम करणारा एक मोठा वर्ग आहे. या सर्वच वर्गाने त्यांनी निवृत्ती न घेण्याची आग्रही मागणी केली आहे. आपणही पुढील दोन दिवसांत श्री. पवार यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह भेट घेऊन निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक अबिद नाईक यांनी म्हटले आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रातच शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे दैवत म्हणून पाहतात. आमच्यासारख्या सामान्य कार्यकत्याच्याही पाठीशी राहण्याचे काम शरद पवार हे नेहमीच करत असतात. त्यांच्यामुळेच पला व पदाला ग्लॅमर असून ते कायम रहावे, अशी त्यांना मानणाऱ्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्तावर्गाची इच्छा आहे.
त्यामुळे सिंधुदुर्गमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने आपण पुढील दोन दिवसांत मुंबईत जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदी कायम रहावे, अशी आमची मागणी आहे. आपणा सर्वांचे देवत असलेले श्री. पवार हे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी रहायलाच हवेत, अशी सर्वांचीच धारणा आहे. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती करणार असल्याचे श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
कणकवली प्रतिनिधी