गावच्या उद्योजक विकासाचा मास्टर प्लॅन तयार करा!

तळवडे गाव विकासाच रोल मॉडेल आहे ,मी पुर्ण सहकार्य करणार
दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आश्वासन
स्व.प्रकाश परब यांनी केलेले सामाजिक कार्य नेहमी प्रेरणादायी ठरणार!
आमदार वैभव नाईक
तळवडे येते पर्यटन महासोव उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले मत
सावंतवाडी प्रतिनिधि
तळवडे गावं विकासाच रोल मॉडेल आहे, स्वर्गीय प्रकाश परब यांनी गावच्या विकासाच्या दृष्टीने विविध उपाययोजना आखल्या होत्या त्यामुळे तळवडे गावात व पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विकासाचा मास्टर प्लॅन तयार करा ,त्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करणार आहेत .सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार आहे .त्यामुळे येथील लोकांचे अपेक्षा माझ्याकडे असणार आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचा व ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे येथील जनतेला पर्यटन व इतर सर्वागीण विकास करण्यासाठी व उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यासाठी येथील ग्रामीण भागांतील लोकप्रतिनिधींनी औद्योगिक विकासाचे मास्टर प्लॅन तयार करून आपल्याला द्यावे त्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करणार असे मत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तळवडे येथे प्रकाश परब मित्र मंडळ, सेवाभावी संस्था व तळवडे ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमा वेळी यावेळी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्व,प्रकाश परब यांच्या सामाजिक कार्याची माहिती प्रेरणा देणारी असल्याचे सागितले, व्यासपीठावर उद्धव बाळासाहेब ठाकरे चे शिवसेना पक्ष आमदार वैभव नाईक माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,
सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, सदा गावडे, तळवडे सरपंच अनिता मेस्त्री, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उद्योजक बंड्या परब, प्रकाश परब यांचे पुत्र कु सूरज परब, सामजिक कार्यकर्ते दशरथ मल्हार, उद्योजक रविंद्र परब, माजी सरपंच निरवडे हरी वारंग, भास्कर वेद्य, बाबा मालवणकर, विनोद काजरेकर, सुरेश गावडे, अनिल जाधव, तळवडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष आपा परब, रविंद्र सावंत, रविंद्र काजरेकर,तळवडे उपसरपंच गौरेश मेस्त्री, महेश परब, दिलीप मालवणकर, बाळू कांडरकर, स्नेहल राऊळ, विलास नाईक, योगेश सावंत, संतोष राऊळ, नमिता सावंत, तात्या परब, आनंद बुगडे, तसेच प्रकाश परब मित्रमंडळ व सेवा संस्था याचे कार्यकर्ते यावेळी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते. ह्या पर्यटन महोत्सवचे उद्घाटन सर्व पक्षांच्या कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन करण्यात आल. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे या ठिकाणी प्रकाश परब मित्रमंडळ, सेवाभावी संस्था, तळवडे ग्रामस्थ याच्या वतीने तळवडे या ठिकाणी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळवडे गावातील चित्ररथ, तसेच कुडाळ नेरूर, म्हापणं गावातील चित्ररथ रोमाट नृत्य सादर करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत व आभार प्रदर्शन अनिल जाधव यांनी केले.