मराठा सेवा संघ कणकवली तालुकाध्यक्षपदी सुशील सावंत

तर कार्याध्यक्षपदी भूषण राणे..

जिल्हाध्यक्ष एस. टी. सावंत यांनी निवड केली जाहीर

मराठा सेवा संघ कणकवली तालुका कार्यकारीणी जिल्हाध्यक्ष एस. टी. सावंत यांनी आज जाहीर केली.मराठा सेवा संघ कणकवली तालुकाध्यक्षपदी सुशील सावंत तर कार्याध्यक्षपदी भूषण राणे,सचिव सदानंद चव्हाण, खजिनदार रुपेश आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांना यावेळी समाजाची संघटनात्मक बांधणी करत समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करण्याचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष एस. टी. सावंत यांनी केले.
कणकवली येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी लवू वारंग(कुडाळ), सचिवपदी एस.एल.सपकाळ ,जिल्हा सहसंघटक अनुप वारंग,निळकंठ वारंग,अविनाश राणे,शंकर मुळये,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन कणकवली तालुका कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष राजू राणे ,पिंटू सावंत,रमाकांत राऊत,सहसचिव गजानन सावंत , तालुका संघटक विक्रांत रासम, सह संघटक प्रवीण सावंत,प्रसिद्ध प्रमुख अजित सावंत, सदस्य म्हणून लक्ष्मण घाडीगावकर ,सागर वारंग,राजू राणे,अंबाजी राणे, सुशांत राऊळ, दिनेश सावंत, रुपेश राणे, अक्षय वारंग, महेश घाडीगावकर आदींचा समावेश आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!