सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील शेतकऱ्याचा दगडाने ठेचून खुन
सावंतवाडी प्रतिनिधि
सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील लवू रामा सावंत या ५५ वर्षीय शेतकरी यांचा डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मयत सावंत हे आपल्या शेतात असणाऱ्या मांगरात रात्री झोपले होते. सकाळी त्यांचा भाऊ शेतात गेला असता त्याने आपल्या भावाला मृतावस्थेत पाहिले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलीस हवालदार दत्ता देसाई करत आहेत.