कणकवली तालुका युुवक काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष पदी अनिकेत दहीबावकर यांची नियुक्ती

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या सह पदाधिकाऱ्यांकडून नियुक्त पत्र प्रदान
कणकवली तालुका युुवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी काँग्रेस चे कार्यकर्ते अनिकेत दहीबावकर यांची नियुक्ती युवक काँग्रेस चे सिंधुदुर्ग प्रभारी दीप काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तेव्हा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष ईर्षाद भाई शेख युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट देवगड युवक तालुकाध्यक्ष सुरज घाडी महादेव दहीबावकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गावागावात युवकांची फळी उभी करून काँग्रेस चा विचार घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांनी केला.
कणकवली प्रतिनिधी