आपली शाळा पुढे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ! : राजाराम सावंत

बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीचे भूमिपूजन

कुडाळ : चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाबरोबरच शाळेची सुसज्ज तसेच पुरेशी इमारत हा शाळेच्या प्रगतीचा भाग आहे. याच विचारातून संस्थेने लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाचा संकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी आवश्यक निधी संकलनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. आपली शाळा पुढे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. तुमची साथ महत्त्वाची आहे, असे आवाहन संस्थाध्यक्ष राजाराम सावंत यांनी बिबवणे येथे केले.
बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीचे भूमिपूजन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व दोडामार्ग येथील उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी संस्थाध्यक्ष सावंत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यालयाचे माजी विद्यार्थी विलास खवणेकर, संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद नाईक, माजी उपाध्यक्ष दयानंद सामंत, माजी सचिव रमाकांत चव्हाण, दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गवस व दिनकर उगवेकर, सिनियर इंजिनियर सुभाष कामत, मुबई विद्यापीठाचे प्रा. श्रीधर पेडणेकर, संस्था उपाध्यक्ष आनंद गावडे, सचिव व माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, खजिनदार भरत सामंत, सहसचिव विठ्ठल माळकर, संचालक वामन सावंत, वामन राऊळ व निखिल ओरोसकर, बिबवणे सरपंच शीतल कुडपकर, उपसरपंच दीपक सावंत, ग्रामंचायत सदस्या अंजली सुर्वे, मुख्याध्यापिका एस. एस. परब, सेवानिवृत्त शिक्षक विलास मळगावकर व मधुकर कुबल, इंजिनियर रुपेश तवटे, आर्किटेक्ट अभिषेक माने ,माजी सरपंच दत्ताराम कुबल, स्मिता आरोलकर, गणपत शिरोडकर, डॉ. संतोष जाधव, अनिल शिरोडकर, वसंत बिबवणेकर, वामन गावडे, अजय गावडे, प्रकाश सावंत, सतीश पडते, ग्रामपुरोहित राजू धुपकर यांच्यासह माजी विद्यार्थी, संस्था सभासद, ग्रामस्थ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
राजाराम सावंत म्हणाले, विद्यार्थांच्या भवितव्याच्या दृष्टीने नवीन इमारतीची गरज ओळखून संस्थेने हे पाऊल उचलले आहे. तुम्ही-आम्ही सर्वांनी मनावर घेतले तर आदर्श शाळा निर्माण होईल. माजी विद्यार्थी , पालक, ग्रामस्थ व विविध शेत्रातील दात्यानी या इमारतीचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण म्हणजे नुसते पुस्तकी ज्ञान घेऊ नका. सर्वच संस्कार शाळेतून मिळत नाहीत. आई – वडील व समाजाकडून जे जे चांगले मिळेल ते आत्मसात करा, असे त्यांनी विद्यार्थांना सांगितले. विवेकानंद नाईक म्हणाले, त्याकाळी या दशक्रोशितील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्याकाळी हे ज्ञानमंदिर उभे राहण्यासाठी कुणीतरी जमीन दिली. तसेच श्रमदानातून आणि पै – पै जमा करून ही इमारत उभी केली. सस्था व शिक्षक ज्ञानाचे विचार तुम्हाला देत आहेत. तुम्ही भविष्यात नोकरी व उद्योग व्यवसायातून आर्थिक सबल होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी चांगले शिक्षण घेऊन आयुष्यात उत्तुंग भरारी घेण्याचा प्रयत्न करा,असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले. भावी पिढीचा भविष्यकाळ उज्यल होण्यासाठी नवीन शिक्षण प्रणालीचा विचार करून या सस्था संचालक मंडळाने नवीन इमारत बांधण्याचा संकल्प केला आहे. तो निश्चित पूर्ण होणार आहे.आपण त्यासाठी खारीचा वाटा देईन, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापिका परब व संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक प्रकाश कुबल यांनी तर सूत्रसंचालन व आभार शिक्षक भास्कर पारधी यांनी मानले.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!