वेताळ बांबर्डेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

कुडाळ ; ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिर ‘उत्कर्ष २०२३’चे आयोजन आज मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे येथे करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रा. अनुराग पाणिग्रही यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
यावेळी संचालक तथा प्राचार्य व्ही. एम. इंग्लिश मीडियम स्कूल, लांजा-रत्नागिरीचे प्रा. अनुराग पाणिग्रही यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी कशाप्रकारे वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतील याचे मार्गदर्शन केले. यामध्ये कॉम्पुटर क्षेत्रात नवी क्रांती होताना पुढील ५ वर्षात नोकरीच्या संधी, स्पर्धा परीक्षामध्ये करिअर संधी यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडीचे प्रा. डॉ. साईनाथ सितावार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतःचा विकास करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याचे मार्गदर्शन केले. तसेच या शिबिरात निवृत्त प्राध्यापक प्रकाश घाडी, प्रा. सर्जेराव झेंडे, प्रा. दीपक हेब्बाळकर, प्रा. प्रसाद सामंत यांनी सुद्धा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, साजूराम नाईक, ग्रामसेवक पिंटो, रश्मी तिवरेकर, समृध्दी कदम, जागृती गावडे, सृष्टी सावंत, सुदिव्या सामंत, शैलेश घाटकर, दशरथ कदम तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात पणदूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!