कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिज खालील विक्रेत्यांना हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू

मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात मोहिमेचा पुन्हा श्री गणेशा

दुकाने हटवण्यास काहींकडून विरोध

कणकवली शहरात महामार्गालगत फ्लाय ओव्हर ब्रिज खाली बसणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांना हटाव मोहीम पुन्हा आज शनिवार पासून हाती घेण्यात आली. यापूर्वी स्टॉल हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर पुन्हा अनेक विक्रेत्यांनी अनधिकृत रित्या फ्लाय ओव्हर ब्रिज खालील दुकाने मांडल्याने वाहतूक कोंडी सह अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. आज शनिवारपासून कणकवली पटवर्धन चौकापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात महामार्ग प्राधिकरण मार्फत ही मोहीम हाती घेण्यात आली असून, फ्लाय ओव्हर ब्रिज खालील बसणाऱ्या विक्रेत्यांनी या मोहिमेला विरोध केला आहे. मात्र फ्लाय ओव्हर ब्रिज खाली कोणत्याही परिस्थितीत दुकाने थाटू देणार नसल्याची भूमिका महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी कार्यवाही सुरू करण्यात आली असली तरी काहींकडून या मोहिमेला विरोध केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या मोहिमेबद्दल पुढे काय निर्णय होणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!