कणकवलीतील स्वागत बोर्ड, फ्लाय ओव्हर खालील स्टेडीयम चे उद्या लोकार्पण

माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणेंची उपस्थिती
नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली गडनदी जवळ श्रीधर नाईक उद्यानानजीक लावण्यात आलेल्या एलईडी स्वागत बोर्ड व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साकारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्टेडियम व फुटबॉल स्टेडियम चे लोकार्पण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते व आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या रविवारी करण्यात येणार आहे. स्वागत बोर्ड चे लोकार्पण सायंकाळी 7 वाजता तर स्टेडियम चे लोकार्पण सायंकाळी 7.30 वाजता करण्यात येणार आहे. कणकवली शहरातील जनतेला नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतानाच जनतेला क्रीडा, सांस्कृतिक सह विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली