स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शिक्षक पुरस्काराचे वितरण.. अविष्कार फाउंडेशन सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचा उपक्रम…

अविष्कार फाउंडेशन इंडिया संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन स. का. पाटील महाविद्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुल चे चेअरमन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे होते प्रमुख पाहुणे म्हणून कृ सी देसाई शिक्षण मंडळाचे सचिव श्री चंद्रशेखर कुशे उपस्थित होत होते. या कार्यक्रमाचे आयोजन आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समारंभाचे स्वागताध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक कैलास राबते यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालया बद्दल विस्तृत माहिती उपस्थितांना दिली व्यासपीठावरील सर्व मान्यवर पाहुण्यांचा ग्रंथ आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अविष्कार फाउंडेशनच्या सचिव सौ प्रतिमा पवार अविष्कार फाउंडेशन चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष झिलू गोसावी अविष्कार फाउंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सौ तेजस्विता वेंगुर्लेकर माजी मुख्याध्यापक श्री बारदेश कर सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या समारंभात सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या 42 विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मानपत्र अविष्कार फाउंडेशनच्या वतीने दिले शिक्षक दिनाच्या निमित्ताने मानसी प्रभू, अस्मिता कुडाळकर, सुरेंद्र संकपाळ, डॉक्टर अरुण गोडकर, शुभांगी मयेकर, सचिन हजारे, अनंत देवळेकर, चंद्रशेखर बांदेकर, डॉक्टर एम आर खोत, संगीता वडर, प्राध्यापिका रोहिणी फाटक, श्रीमती सुपर्णा भाईप, श्री दीपक जाधव आणि श्री दासू गावित या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष जीलो गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ तेजस्विता वेंगुर्लेकर यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते






