कणकवली रोटरी च्या ‘श्रावण साज’ मध्ये रंगली श्रावणी फुगडी

या उपक्रमाला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, इनरव्हील क्लब ऑफ कणकवली साज आणि पदर महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रोटरी श्रावण साज’ या कार्यक्रमात पारंपरिक श्रावणी फुगड्यांनी भालचंद्र महाराज सभागृहात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले.
पारंपरिक “घागर घुमू दे घुमू दे, पोरी पिंगा ग, तांदूळ सुपात… सुप माझ्या हातात, अक्काबाईचा कोंबडा, नाव डोले दर्यावरी, चला झिम्मा खेळूया, लाट्या बाई लाट्या” अशा विविध गाण्यांच्या तालावर महिलांनी फुगडी, झिम्मा आणि पिंगा खेळत श्रावणाचा आनंद लुटला.
शहरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दैनंदिन धावपळ विसरून पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद घेतला. “नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे” या भावनेने संपूर्ण सभागृह फुगड्यांच्या तालावर दुमदुमून गेले.
विशेष म्हणजे, फुगड्यांच्या तालावर घागर घुमू लागली आणि त्याचवेळी श्रावणधारांनीही जोरदार बरसत या आनंदोत्सवाला जणू सलामी दिली. त्यामुळे ‘रोटरी श्रावण साज’चा आनंद द्विगुणित झाला.यावेळी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया नलावडे, इनरव्हील क्लब ऑफ कणकवली साजच्या अध्यक्षा राजश्री रावराणे, पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांच्यासह प्रियाली कोदे, साक्षी वाळके, साक्षी सादये, भारती पाटील, दिशा अंधारी, संपदा पारकर, स्वाती राणे, आरती राणे, विनिता राणे, विणा राणे, सविता राणे, राजश्री परब, सानिका परब, क्रांती लाड, मोहिनी राठोड, वैजयंती मुसळे, रंजना कुडतरकर, उमा परब, वर्षा बेळेकर, उज्ज्वला धानजी, नीलिमा नाटेकर, स्मिता कामत, अमिता जावडेकर, रश्मी नवाळे मॅडम, सरोजिनी मुसळे, पूर्वा सुतार, संजीवनी सुतार, अर्चना सुतार,संध्या पोरे, वसुधा माने, वर्षा बेळेकर,शांती सावंत, याज्ञवी कोदे, सुषमा पोटफोडे, शीतल निखार्गे, संगीता कांबळी, सीमा गुरसाळे, शोभा बेळेकर, विशाखा गाड,नीलम जाधव,रेणुका राठोड यांच्यासह शहरातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत फुगड्यांचा आनंद लुटला.
गांगेश्वर महिला फुगडी ग्रुप तसेच ल. गो. सामंत विद्यालय ग्रुप यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमासाठी डॉ. सुहास पावसकर यांचे विशेष सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, फुगड्यांच्या तालावर घागर घुमू लागली आणि त्याचवेळी श्रावणधारांनीही जोरदार बरसत या उत्सवाच्या आनंदात जणू सहभाग नोंदवला. त्यामुळे कार्यक्रमाला एक आगळेच प्रसन्न आणि उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.

error: Content is protected !!