भजनी बुवा मृदुंग वादक यांनी मांडल्या आमदार प्रमोद जठार यांच्याकडे समस्या

आपण जोपासत असलेली कला ही कोकणच्या संस्कृतीचा भाग आहे
आमदार प्रमोद जठार यांच्याकडून भजनी बुवा, मृदुंगमनी यांना सहकार्याचे आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्हा भजनी मंडळ बुवा व मृदूंग वादक यांनी आज कणकवली विश्रामगृह येथे आमदार प्रमोद जठार भेट घेतली व आपल्या विविध समस्या मांडल्या यावर त्यांना मार्गदर्शन केले. भजन ही कोकणची लोकपरंपरा आहे. आपण भजनी बुवा ही संस्कृती जोपासात आहात. यावेळी मी आपण सर्व भजनी बुवांन सोबत आहे असे उपस्थित सर्व मंडळींना आश्वासन दिले. यावेळी बुवा संतोष कानडे, बुवा प्रकाश पारकर, बुवा संतोश मिराशी, बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा गोपी लाड, मारुती मेस्त्री, हेमंत तवटे, सुदर्शन फोपे, पंढरी जाधव आदी भजनी बुवा मृदूंग वादक उपस्थित होते.






