उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगरपंचायत ला खडबडून जाग

सिद्धार्थ नगर स्मशानभूमी येथे केली तात्काळ लाकडांची व्यवस्था
माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी दिला होता स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा
कणकवली शहरामधील सिद्धार्थनगर स्मशानभूमी येथे मृतदेह वर अंत्यसंस्कार करण्याकरिता लाकडाची व्यवस्था नसल्याबाबत माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी स्वातंत्र्यदिनी लक्षवेधी उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ या स्मशानभूमी जवळ लाकडांची व्यवस्था केली आहे. लाकूड गोडावून मध्ये लाकूड व्यवस्था त्याबद्दल प्रशासनाचे आभार मात्र केवळ तात्पुरती व्यवस्था न राहता कायमस्वरूपी लाकूड व्यवस्था करावी गेले अनेक महिने लाईट नाही ती व्यवस्था लवकरात लवकर करावी अशी मागणी गौतम खोडकर यांनी केली आहे. व संरक्षण भिंत बांधण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. यावेळी गौतम खुडकर भुषण कांबळे गौतम हिंदळेकर विनायक तांबे मिखील कांबळे रोहित कांबळे आदी उपस्थित होते.






