कणकवलीत १ व २ ऑगस्ट रोजी ‘गुरुपौर्णिमा २०२६’ निमित्त दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सव

दिग्गज नामवंत गायकांचे होणार गायन व तबलावादन

या संगीत महोत्सवात सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली संचलित पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्र व तबला प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुरुपौर्णिमा २०२६’ या दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली येथे संपन्न होणार आहे. संगीतप्रेमींना दर्जेदार शास्त्रीय गायन व तबलावादनाची मेजवानी अनुभवता येणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन पं. डॉ. समीर दुबळे व श्री. चारुदत्त फडके यांच्या शिष्यवृंदामार्फत करण्यात आले आहे. विविध विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन, तबलावादन तसेच नामवंत कलाकारांची विशेष मैफल हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
शनिवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत उद्घाटन सोहळ्यासह पहिल्या सत्रात सीमा कोरगांवकर, दामोदर खानोलकर, संदीप पेंडूरकर डॉ. समीर नवरे हे गायन तर आरोह पेंडूरकर, सोहम मुळ्ये, अमेय तामानेकर हे तबला सह वादन करणार आहे. तसेच संपदा नर, ऋचा पिळणकर, तबला वादन दर्श परब वैभव सुतार शंकर तामाणेकर गायन विश्रांती कोयंडे ईश्वरी तेजम, सायंकाळी ५ ते ८ या दुसऱ्या सत्रात पूर्वा केळकर, राहुल, रवीराज काळे, श्रुती सावंत यांचे गायन होणार असून विशेष अतिथी म्हणून नाशिकचे पं. मकरंद हिंगणे यांची विशेष गायन मैफल रंगणार आहे. रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते १ या तिसऱ्या सत्रात वैष्णवी वैष्णवी मुखेकर, डॉ. पांडुरंग सुतार, यांचे गायन तर तबलावादन वेदांत कुयेस्कर, अथर्व पिळणकर, गायन सानिका गावडे पल्लवी पिळणकर होणार आहे. यावेळी तबला प्रशिक्षण केंद्राचे गुरु श्री. चारुदत्त फडके यांचे एकल तबलावादन हे विशेष आकर्षण असेल. सायंकाळी ५ ते ८ या समारोप सत्रात मृदुला तांबे व निलेश धाकरस यांचे गायन होईल. त्यानंतर गुरुपूजन सोहळा पार पडणार असून कार्यक्रमाची सांगता गुरु पं. डॉ. समीर दुबळे यांच्या गायनाने होणार आहे.
या दोन दिवसीय संगीत महोत्सवाला कणकवली व परिसरातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!