सिकंदराबादच्या निराधार मुलांनी केली विमान प्रवासासह कोकणची सफर

सिकंदराबाद व कुडाळ रोटरी क्लबसह वाल्मिकी फाउंडेशनचा विंग्ज ऑफ होप उपक्रम
विंग्स ऑफ होप उपक्रमा अंतर्गत वाल्मिकी फाउंडेशन सिकंदराबाद, रोटरी क्लब ऑफ सिकंदराबाद व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या माध्यमातून सिकंदराबादच्या २० निराधार मुलांना आयुष्यातील पहिला विमान प्रवासासह कोकणची सफर करविण्यात आली. बेंगलोर ते चिपी अनोखा विमान प्रवासामुळे निराधार मुलांच्या चेह-यावर अनोखा आनंद पहावयास मिळाला.
यावेळी सिकंदराबादच्या वाल्मिकी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी असिस्टंट गव्हर्नर रो. वाल्मिकी हरिकिशन, असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे, रोटरी क्लब ऑफ सिकंदराबादचे अध्यक्ष मोहन रायडू, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश म्हाडदळकर, खजिनदार डाॅ जयश्री केसरे, माजी असिस्टंट गव्हर्नर गजानन कांदळगावकर व सचिन मदने, रविंद्र परब , संजय पिंगुळकर, राजेंद्र केसरकर, आनंद वेंगुर्लेकर, नीता गोवेकर, सेवानिवृत्त शिक्षिका सौ अस्मिता परब,सौ मनाली नाईक आदी उपस्थित होते.
दुपारी ३ वाजता हैद्राबाद येथून विमानाने हि निराधार २० मुले चीपी विमानतळावर संध्याकाळी ५ वाजता दाखल झाली. रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून या मुलांचे चीपी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गजानन कांदळगावकर. आनंद वेंगुर्लेकर, सेक्रेटरी राकेश म्हाडदळकर, खजिनदार डाॅ जयश्री केसरे उपस्थित होते.
खास कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आयत्यावेळी श्री वाल्मिकी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी असिस्टंट गव्हर्नर रो. वाल्मिकी किसन यांचा संदेश आला की विमानामध्ये मुलांचा नाश्ता विमान कंपनी कडून रद्द करण्यात आला आहे, तेव्हा तुम्ही जरा मुलांसाठी काहीतरी नाश्ता घेऊन या, अचानक आलेल्या या संदेशामुळे धावपळ होऊनही खजिनदार रो डॉ जयश्री केसरे यांनी अर्जंट खूप सुंदर नाश्ताची फूड पॅकेट तयार करून घेत उत्कृष्ट नाश्त्याची सोय केली.
या २०निराधार मुलांना बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्कूल बसने कुडाळ पिंगुळी येथील पद्मश्री श्री परशुराम गंगावणे यांच्या ठाकूर आदिवासी कला अंगण येथे आणण्यात आले. पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांनी सर्वांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मग सर्व मुलांना त्यांचे म्युझियम दाखविण्यात आले. रामायणातील श्री राम सीता स्वयंवर हा भाग पपेट शो मध्ये दाखविण्यात आला. कोकणातील ठाकर आदिवी कला जवळून अनुभवण्याची संधी या वीस निराधार मुलांना या उपक्रमातून अनुभवयास मिळाली.
हॉटेल स्पाईस कोकणच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये 20 निराधार मुलांना एकत्र करण्यात आले. तेथे कुडाळ आवळेगावच्या कलाकार्यानुभवच्या उत्कृष्ट सेवानिवृत्त शिक्षिका सौ अस्मिता परब मॅडम यांनी सर्व मुलांना कागदापासून विविध आकर्षक फुले व बुके तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला मुलांचा उस्फुर्त सहभाग मिळाला. मुलांना रोटरी क्लब कुडाळचे माजी अध्यक्ष राजेंद केसरकर यांच्या मार्फत आपल्या क्लबची आठवण म्हणून खाऊचे बाॅक्स देण्यात आले. विशेष महत्त्वाचे म्हणजे मुलांची राहणे, जेवण व सकाळी नाश्ता याची सर्व व्यवस्था रोटरी क्लब कुडाळचे सचिव राकेश म्हाडदळकर यांच्या हॉटेल स्पाईस कोकण येथे करण्यात आली.
विंग्ज ऑफ होप निमित्त वाल्मिकी फाऊंडेशन सिकंदराबाद ,रोटरी क्लब ऑफ सिकंदराबाद यांचेवतीने माजी असिस्टंट गव्हर्नर डाॅ वाल्मिकी हरिकिशन यांचेहस्ते कुडाळ पिंगुळी येथील आदिवासी ठाकर कला केंद्राचे संस्थापक पद्मश्री परशुराम गंगावणे व रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष मकरंद नाईक यांचा शाल ,सन्मानचिन्ह देवून विशेष सन्मान करण्यात आला.
या उपक्रमासाठी गजानन कांदागावकर, रवींद्र परब, नीता गोवेकर, आनंद वेंगुर्लेकर, डॉक्टर जयश्री केसरे, राकेश म्हाडदळकर, राजू केसरकर, सचिन मदने, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर, रीलस्टार आकाश भोगटे, तसेच इतर सर्व रोटरी सदस्यांचे कुडाळ रोटरी अध्यक्ष मकरंद नाईक यांनी विशेष आभार व्यक्त केले.






