ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत

ओसरगावचे माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष देवस्थानचे खजिनदार, प्रगतशील शेतकरी उत्कृष्ट भजनी बुवा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रदीप तळेकर यांनी नुकताच आज माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेशाप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,कळसुली विभाग प्रमुख बबली राणे प्रमोद कावले नितीन धुरी बबन देसाई दशरत शिंदे बंड्या भुजबळ दिलीप तळेकर पांडुरंग शिंदे यशवंत चव्हाण प्रकाश परब मुरलीधर परब महादेव राठवड प्रमोद सावंत राजू राणे रवी परब अनंत राणे रवी सावंत शिरीष घाडीगावकर व विभागातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!