महंत गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत माड्याचीवाडी येथे योग दिन साजरा

योग प्राणायाम कार्यशाळेला भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

योग शिक्षक आनंद सावंत यांनी केले मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भक्त सेवा न्यास माड्याची वाडी येथील योगशिक्षक शाळेमध्ये श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या योग प्राणायाम कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय किर्तीचे योगशिक्षक आनंद सावंत यांनी यावेळी योगाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला. महंत गावडे काका महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीतून योग आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन केले. आजपर्यंत गावडे काका व त्यांच्या फक्त सेवान्यास यांच्यामार्फत १०० हून अधिक योगशिक्षक समाजाला दिले असून ते आपले कर्तव्य बजावत आहेत.
आंतरराष्ट्रीय योगा दिवस सुरू होण्या अगोदर तीन वर्ष काकांच्या माध्यमातून दर वर्षी २१ जूनला योगा वर्ग घेतला जात होता. त्या दिवसाचे महत्त्व म्हणजे तो वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. योगायोग म्हणजे त्याच दिवसाला आंतरराष्ट्रीय योगा दिवस घोषित करण्यात आलेला आहे
यावेळी सुजय गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी भाजपा सिंधुदुर्ग सौ. श्वेता कोरगावकर, माजी सभापती कुडाळ पंचायत समिती तथा भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य राजू राऊळ, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. अदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा महिला तालुकाध्यक्ष कुडाळ सौ. आरती पाटील, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सौ. श्रेया गावंडे, माजी नगरसेवक राजू गावंडे, तसेच भक्त सेवा न्यास माड्याची वाडी यांचे योगसाधक व योगशिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!