महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने नाभिकांचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची जयंती मालवण मध्ये होणार साजरी

दोडामार्ग : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने नाभिकांचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची जयंती सोमवारी (ता.१७) संपूर्ण जिल्हा नाभिक बांधवांच्या उपस्थितीत मालवण येथीच मामा वरेरकर नाट्यगृहात साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रम असे:
सकाळी ९ ते १०-दत्तमंदिर भरड ते नाट्यगृहापर्यंत शोभायात्रा
सकाळी १० ते १०.३० वा. अल्पोपहार
सकाळी १०:३० ते १०:४५.
श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन
दुपारी १०.४५ ते १२.३०वा.
महेश धामापुरकर यांचे सुश्राव्य कीर्तन व
मान्यवरांचे स्वागत
दुपारी १२.३० ते १.३० वा
मान्यवारांची भाषणे
दुपारी १.३० ते २.०० वा.
: स्नेहभोजन
दुपारी २.०० ते ३.०० वा.
: महिलांसाठी हळदीकुंकु व सांस्कृतिक कार्यक्रम
दुपारी ३.०० ते ४.०० वा.
: जिल्हा कार्यकारिणी सर्वसाधारण बैठक
दुपारी ५.०० वा.
समारोप
खास आकर्षण आचरे विभाग आणि नांदोस विभाग यांची आगळा वेगळा दिंडी सोहळा
तरी सर्वांनी
सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन
जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण,सचिव सुधीर चव्हाण,
प्रवीण कुबल व प्रतिभा चव्हाण, तालुकाध्यक्ष ॲड.भाऊ चव्हाण, सचिव चंद्रकांत चव्हाण आदींनी केले आहे.