भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून पोखरण येथे ओपन जिम मंजूर

पोखरण बौद्धवाडी ग्रामस्थांनी केली होती मागणी
कुडाळ : तालुक्यातील पोखरण बौद्धवाडी येथे ओपन जिम व्हावी यासाठी भाजपा ओरोस मंडल मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विनोद कदम यांनी भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्यामार्फत भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याजवळ पोखरण येथे ओपन जिम व्हावी यासाठी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निलेश राणे यांनी पोखरण बौद्धवाडीसाठी ओपन जिम मंजूर केली असून पोखरण येथील आनंद कदम यांच्या जागेत ही जिम साकारणार आहे. या जिमच्या उभारणी नंतर निलेश राणे यांच्या हस्ते या जिमचा लोकार्पण सोहळा होणार असून ही जिम उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा नेते निलेश राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांचे पोखरण बौद्ध विकास मंडळ पोखरण गाव शाखा, सावित्रीबाई महिला मंडळ पोखरण आणि ब्लू स्टार कला व क्रीडा मंडळ पोखरण यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
प्रतिनिधी, कुडाळ