एस. एम. हायस्कूल कणकवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

खारेपाटण : १४ एप्रिल २०२३ रोजी एस. एम. हायस्कूल कणकवली या प्रशालेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या वंदनीय कै. पारकर साहेब सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे कार्याध्यक्ष डॉ.तायशेट होते. यावेळी संस्था उपकार्याध्यक्ष श्री. काणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे एस. एम. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वायंगणकर, उपमुख्याध्यापक श्री कांबळे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर प्रशालेच्या उपमुख्याध्यापक यांनी पूजापठण- प्रार्थना सादर केली. त्याचबरोबर प्रशालेच्या इयत्ता अकरावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी भीमगीत सादर केले. उपमुख्याध्यापक श्री. पी व्ही कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये प्रशालेमध्ये आंबेडकर जयंतीची सुरुवात आणि त्यामध्ये संस्था पदाधिकाऱ्यांचा सहभाग व या कार्यक्रमातील प्रगतीचा चढता आलेख आढावा आपल्या प्रभावी भाषाशैलीमध्ये मांडला.
यानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यांची मनोगती झाली. यामध्ये पूजा बागवे ,आर्या कदम, संध्या गोधळकर, मृणाली लांबर व सेजल सावंत या विद्यार्थिनींनी आपले विचार प्रकट केले.
शिक्षकांमधून श्री घोरपडे सर यांनी तर शिक्षकेतर कर्मचारी श्री. अनिल कदम यांनी भीमशक्ती प्रेरीत अतिशय उत्तम असे गीत सादर करत आपले विचार प्रकट केले. या कार्यक्रमा वेळी उपकार्याध्यक्ष श्री. काणेकर साहेब यांनी जीवनामध्ये यशस्वी लोकांचे दाखल देऊन विद्यार्थ्यांना प्रेरीत केले. संस्थाकार्याध्यक्ष डॉ.तायशेटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विविध प्रसिद्ध पुस्तकांचा आडवा घेत विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करणारे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री.एस.एम.पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. सी.डी हिर्लेकर यांनी केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण