हुमरमळा-वालावल गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ

मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्य्यांचे सरपंचानी केले स्वागत

उद्यान महाविद्यालय मुळदेच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी हुमरमळा गावात दाखल झाले असुन पुढील सहा महिने या गावात वास्तव्य करुन शेती व ग्रामीण जिवनाचा अभ्यास करणार आहेत.
त्यांनी हुमरमळा वालावल ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली. त्या वेळी सरपंच अमृत देसाई, ग्रामविकास अधिकारी श्रीम अपर्णा पाटील, उपसरपंच सौ. रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. हेमांगी कद्रेकर, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र सावंत, यांची त्यांनी भेट घेतली. या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव, कार्यक्रमाचे महत्त्व, शेतक-यांना होणारे फायदे, तसेच आधुनिक शेती विषयक माहीती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी माहीती दिली. तसेच महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच अमृत देसाई यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कु सृष्टी देशमुख, सिध्दी कांबळे, वैष्णवी पवळ, स्नेहल गरंडे, शालिनी पारधी, धनश्री वणकर, माधवी रटाटे, श्रृती शिरगुरे या विद्यार्थ्यांचा सहभाग असुन त्या पुढील सहा महीन्याच्या कालावधीत गावातील शेती पध्दती, पिक व्यवस्थापन, शेतक-यांच्या अडचणी तसेच कृषी विकास या विविध बाबींवर अभ्यास करणार आहेत.
या उपक्रमामुळे शेतक-यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पिक संरक्षण, व कृषी विषयक नविन माहितीचा लाभ होणार आहे. हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांनी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी केले आहे.

error: Content is protected !!