‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गातील ५७ महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरांचे आयोजन

महसूल विभागाचे समाधान शिबिर अभियान यशस्वी; प्रशासनाचा नागरिकांशी थेट संवाद

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा क्र. १ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांमध्ये दिनांक ७ मार्च २०२६ ते २२ मे २०२६ या कालावधीत समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा महसूल प्रशासनामार्फत आतापर्यंत ४६ महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरे यशस्वीपणे पार पडली असून आज जिल्ह्यातील आणखी ७ महसूल मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात आली. प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचा हा उपक्रम निश्चितच लोकाभिमुख ठरत असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मच्छिंद्र सुकेटे, कुडाळ प्रांत अधिकारी सौ. कलुसे मॅडम, कुडाळ तहसीलदार श्री. सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य श्री. अमित भोगले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!