हुमरमळा वालावल करमळीवाडी प्राथमिक शाळा दुरुस्ती कधी करणार ?

पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा शिक्षण विभागाला सवाल

हुमरमळा वालावल करमळीवाडी प्राथमिक शाळा कधीही कोसळण्याच्या मार्गावर असुन त्या मुळे पालक जिवमुठीत घेऊन आपल्या पाल्यांना या धोकादायक शाळेत पाठवत आहेत या गंभीर प्रश्नाकडे शिक्षण विभाग लक्ष देईल का? असा सवाल वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी विचारला आहे
हुमरमळा वालावल करमळी वाडीतील प्राथमिक शाळा इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात आला आहे त्यासाठी सौ बंगे यांनी शाळेची पहाणी करुन मुख्याध्यापक सौ म्हापणकर व पालकांकडून वस्तुस्थितीची पहाणी करुन थेट शिक्षण विभागाला इशारा दीला आहे
कुडाळ पंचायत समिती सभापती मिलींद नाईक यांची पालकांसमवेत भेट घेऊन या धोकादायक शाळेच्या दुरुस्ती साठी तातडीने निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सौ बंगे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!