तोंडवळी खालची शाळा बुधवारी उघडली मुलांविनाच

शिक्षक हजर होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्यावर पालक ठाम

शिक्षक हजर न झाल्यामुळे बुधवारी तोंडवळी खालची शाळेत पालकांनी आपली मुले पाठवली नसल्याने शाळा मुलांविनाच उघडली होती. याबाबत सर्व पालकांनी मुख्याध्यापक महाजन यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
शाळेत कार्यरत शिक्षक कामगिरीवर पाठवल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने जोपर्यंत शिक्षकांची पुन्हा शाळेत नेमणूक होत नाही तोपर्यंत शाळेत पाल्यांना न पाठविण्याचा निर्णय पालकांनी एकत्र येत मंगळवारी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
शाळा पूर्ण प्राथमिक तोंडवळी खालची या शाळेची पटसंख्या २८ असून तीन शिक्षक येथे अध्यापनाचे कार्य करत होते.
या शाळेचा एक शिक्षक कामगिरीवर पाठवल्याने सध्या एक मुख्याध्यापक आणि सहशिक्षक मिळून दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कडून एवढ्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी तसेच व्यवस्थित शिकवणी होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत बुधवारी पालकांनी मुख्याध्यापकांची भेट घेऊन आपले म्हणणे लेखी निवेदनाद्वारे सादर केले. यावेळी जान्हवी पराडकर, सुरेंद्र मालंडकर, केतकी मायबा, अनुष्का जुवाटकर, शमिका धुरी, मनस्वी तोडणेकर, गायत्री रेवंडकर, देवेंद्र मायबा, प्रिया तोरस्कर, गणपत शेलटकर, आनंद कोचरेकर, नम्रता नंदकुमार कोचरेकर, गणेश रेवंडकर, नीलिमा रेवंडकर, अनिरुद्ध जुवाटकर पुंडलिक मालंडकर, स्वप्नील संजय तारी, नंदकुमार कोचरेकर, विजय खवणेकर यांसह अन्य पालक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!