विदर्भाला वेगवान विकासाची नवी दिशा ; ५४७ किमी द्रुतगती महामार्गांना मंजुरी

पूर्व-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता
काल मुंबई येथे पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. विदर्भातील ५४७ किमी लांबीच्या चार प्रवेश-नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हे महामार्ग महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम भागांना वेगवान मार्गांनी जोडणार असून, विदर्भाच्या विकासाला नवी गती देणार आहेत.
मान्यता मिळालेले प्रकल्प :
- नागपूर–गोंदिया द्रुतगती मार्ग
- भंडारा–गडचिरोली d्रुतगती मार्ग
- नागपूर–चंद्रपूर द्रुतगती मार्ग
- नवेगाव मोरे–कोन्सारी ते सूरजगड ग्रीनफिल्ड रोड
अधिकाऱ्यांना हे प्रकल्प वेळेत आणि जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, खनिज वाहतुकीसाठी महत्त्वाच्या नवेगाव मोरे–सूरजगड मार्गाला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे निर्देश दिले. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रस्तावित बोगदा मार्गाचा अभ्यास करून सविस्तर सादरीकरण तयार करण्यासही सांगितले.
अखंड, वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल अधिक बळकट होत आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





