वालावलच्या विकासाला नवी ऊर्जा ; नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण संपन्न

आ. निलेश राणे यांच्या हस्ते वालावल येथे विद्युत रोहित्राचे लोकार्पण

कुडाळ तालुक्यातील वालावल गावाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नवीन विद्युत रोहित्र (Transformer) चे लोकार्पण आज उत्साहपूर्ण वातावरणात कुडाळ-मालवणचे आमदार मा. निलेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांना कमी दाबाने वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज तसेच वाढत्या वीजभारामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्यांची दखल घेत नवीन विद्युत रोहित्र उभारण्यात आले असून त्यामुळे वालावल परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत व सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनासोबतच शेतकरी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विकासकामांमुळे ग्रामीण भाग अधिक सक्षम होत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वालावल परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले. गावाच्या विकासासाठी भविष्यातही अशाच पायाभूत सुविधा उभारण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!