दहावीच्या परीक्षेत कुडाळ तालुक्याचा ९८ टक्के निकाल

पाट हायस्कुलची दिया निलेश सामंत तालुक्यात प्रथम
कुडाळ हायस्कुलचा सुधांशू धुरी दुसरा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आला. दहावी परिक्षेचा कुडाळ तालुक्याचा निकाल 98 टक्के एवढा लागला. तालुक्यातून 1603 एवढे विद्यार्थी परिक्षेला बसले होते, पैकी 1571 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष श्रेणीत 644 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 507 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाट हायस्कूलची विद्यार्थीनी दिया निलेश सामंत हिने (500 पैकी 499 गुण) 99.80 टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर कुडाळ हायस्कूलच्या सुधांशू महेश धुरी याने 99.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि पाट हायस्कूलच्या शिवानी मंगेश सर्वेकर हिने 98.20 टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. तालुक्यातील 19 शाळांचा निकाल 100 टक्के एवढा लागला.
कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ या विद्यालयाने १० वीच्या (मार्च २०२५-२६) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९८.५५ टक्के लागला
विद्यालयात सुधांशू महेश धुरी याने ४९८ गुण (९९.६०%) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रथम सुधांशू महेश धुरी (९९.६०%), द्वितीय कु. समृद्धी विलास सरनाईक, कु. आर्या लक्ष्मण आगलावे, आणि कु. वरदा भाग्यविधाता वारंग (प्रत्येकी ९८.००%), तृतीय कु. आयुषी सगुण केळुसकर (९७.००%)
मुलींचे वर्चस्व आणि विषयानुसार यश
मुलींच्या गटात समृद्धी सरनाईक, आर्या आगलावे आणि वरदा वारंग यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, संस्कृत या विषयात तब्बल ७ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून इतिहास रचला आहे. यामध्ये आर्या आगलावे, सुधांशू धुरी, समृद्धी सरनाईक, वरदा वारंग, आयुषी केळुसकर, वेदांत पंडित आणि श्रेयस खोचरे यांचा समावेश आहे.
एकूण प्रविष्ठ विद्यार्थी: २०८
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी: २०५
निकाल: ९८.५५%90 टक्केपेक्षा जास्त गुण सुधांशु महेश धुरी,समृद्धी विलास सरनाईक, कु.आर्या लक्ष्मण आगलावे, वरदा भाग्यविधाता वारंग, कु. आयुषी सगुण केळूसकर, वेदांत विवेक पंडीत, श्रेयस प्रविण खोचरे, अर्थव नागेश तवटे, आयुष आनंद पाटील, ययार्थ केशव तेली, कु.पृथ्वी केतन पडते, कु. दीप्ती गजानन प्रभू, दयानंद गजानन मेस्त्री, चिन्मय श्यामसुंदर परब.
९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी १४ ठरले. विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. वराडे, पर्यवेक्षक श्री. आर. डी. तेली, शिक्षक वृंद आणि संस्था चालकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. कुडाळ परिसरातून या यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवणचा दहावीचा १०० टक्के निकाल
श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल परंपरेप्रमाणे यंदाही १०० टक्के लागला असून विद्यालयाच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावर्षी एकूण २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यापैकी ६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर २ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यश संपादन केले.या परीक्षेत यश विलास पेडणेकर याने ९०.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. जनार्दन विजय बिडये याने ८४.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर भूमिका वामन भरडकर हिने ८३.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे
हळदीचे नेरुर न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९४.१२ टक्के. इयत्ता १० वीच्या परीक्षेत हळदीचे नेरुर येथील न्यू इंग्लिश स्कूल व स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक कला व वाणिज्य (संयुक्त) विद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९४.१२ टक्के लागला असून, कुमारी अनुश्री गणपत कविटकर हिने ९१.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
या विद्यालयातून यंदा एकूण १७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम अनुश्री गणपत कविटकर (९१.४०%),द्वितीय कुमारी शामली प्रकाश मेस्त्री (९०.४०%), तृतीय कुमार प्रसन्ना ज्ञानेश्वर भिके (८२.००%) क्रमांक पटकविला. विशेष म्हणजे, उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत स्थान मिळवून विद्यालयाच्या निकालाची उच्च परंपरा यंदाही कायम राखली आहे.
अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे
ता. वेंगुर्ला,माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६
शाळेचा निकाल १००%
५३ पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण. अवंतिका अमेय देसाई ५०० पैकी ४८९ गुण ९७.८० %, द्वितीय क्रमांक विशाखा प्रभू पंचलींग ५०० पैकी ४६५ गुण ९३.००%तृतीय क्रमांक
श्रृती मधुकर राणे
५०० पैकी ४६४ गुण
९२.८०, आवळेगाव हायस्कूल आवळेगाव व कला वाणिज्य उच्चमाध्यमिक विद्यालय आवळेगाव चा इयत्ता – १० वी 100 %. प्रथम क्रमांक – कु . सिद्धी भिकाजी दुखंडे 81.20 %, द्वितीय क्रमांक, कु . रिना यशवंत चव्हाण 79.60 %तृतीय क्रमांक –
3)कु.किमया नारायण पालव
73.80 %.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष – श्रीम . मानसी सावंत सचिव श्री भिकाजी तळेकर व संचालक मंडळ व मुख्याध्यापक, श्री दशरथ काळे शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक शिक्षक संघ व विद्यार्थी व पालक यांनी शुभेच्छा दिल्या .
बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बिबवणे येथीलच लक्ष्मी नारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 97.72 टक्के लागला. 44 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम श्रेया हनुमंत साळुंके 93.20 टक्के, द्वितीय वरदा विनायक जोशी 90.80 टक्के,तृतीय अनुष्का सूरज कुडपकर 88.80 टक्के यांनी यश मिळविले. संस्थाध्यक्ष राजाराम सावंत, उपाध्यक्ष आनंद गावडे, सचिव प्रकाश कुबल खजिनदार भरत सामंत, सहसचिव
विठ्ठल माळकर व अन्य संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक भास्कर पारधी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक – पालक संघ पदाधिकारी – सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वालावल हायस्कूल १००%
नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल ता . कुडाळ या प्रशालेचा दहावीचा निकाल १००% टक्के लागला. प्रथम- अथर्व विलास मठकर-९४%, द्वितीय- कुणाल अशोक मांजरेकर-८४.८०%, तृतीय- सोनल उदय मठकर
८३.२०%.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष जी.एम.सामंत, संस्था विश्वस्त सौ. स्नेहांकिता सामंत, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आदींकडून अभिनंदन करण्यात आले.
मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. (१० वी) परीक्षेमध्ये शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयातील एकुण ४२ विदयार्थ्यांपैकी ४० विदयार्थी उत्तीर्ण झाले. विदयालयाचा एकुण निकाल ९५.२४ टक्के लागला. विदयालयातून कु रसिका सुर्यकांत धुरी ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम कु. आर्या अशोक कोरगांवकर ९६.६० गुण मिळवून व्दितिय तर कु. निधी एकनाथ सावंत ९६.२० टक्के गुण मिळवून तृतीय आली.
सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. तकिलदार स.म.संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. मुकुद रा.धुरी व सचीव श्री. प्रदिप र तेंडोलकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक पालक संघ, माजी विदयार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
भडगाव हायस्कूलचा 100 टक्के निकाल.
कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु.।।, तालुका- कुडाळ चा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला. या परीक्षेत एकूण 21 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीत 5 प्रथम श्रेणीत 12 द्वितीय श्रेणीत 03, पास 1 असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयात प्रथम क्रमांक कु. सावंत साक्षी गणेश (85.60%), द्वितीय क्रमांक कु. सुतार तन्वी ज्ञानेश्वर (84%) व तृतीय क्रमांक कु. लोट वैष्णवी विठोबा (81.20%) यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मान. श्री. चंद्रशेखर सावंत, सचिव मा. श्री. संभाजी वळंजू, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. सचिन धुरी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डिगस माध्यमिक विद्यालय डिगस माध्य. विद्यालय डिगसचा एस.एस.सी. फेब्रुवारी २०२६ चा निकाल १००% लागला असून प्रथम क्रमांक – कु. आर्यनी सत्यवान गावडे. टक्केवारी- ८४.८०% व्दितीय क्रमांक -कु. श्रावणी धाकू पवार, टक्केवारी- ७९.८०%, तृतीय क्रमांक -कु. सोहम सुधीर घोगळे. टक्केवारी-७८.८०%एकूण २१ विद्यार्थ्यांपैकी विशेस श्रेणी ०३ विदयार्थी प्रथम श्रेणी १० विदयार्थी व्दितीय श्रेणी ०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अमरसेन सांवत, सचिव भुपतसेन सावंत, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, प्र. मुख्याध्यापक सौ. अनुजा अमरसेन सावंत व सर्व संस्थासंचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी इंग्लिश स्कूल
गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा इ. १० वी चा निकाल ९७.६०% लागला. परीक्षेत १२५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले, त्यापैकी १२२ उत्तीर्ण झाले
प्रथम क्रमांक कु. चरण सुभाष साईल गुण ४७५ / ९५.००%व्दितीय क्रमांक
कु. यश रघुनाथ पालव गुण ४६६ / ९३.२०%तृतीय क्रमांक कु. साक्षी लक्ष्मण सामंत गुण ४६४ / ९२.८०%
चौथा क्रमांक कु. दूर्वा जयसिंग घाडी गुण ४५७ / ९१.४०%
पाचवा क्रमांक कु. समृध्दी रघुनाथ दळवी गुण ४५३ / ९०.६०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन श्री. आपासाहेब गावडे, संस्था सचिव श्री. नागेंद्र परब, उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर, संस्था पदाधिकारी व संचालक मुख्याध्यापक श्री. एम. जी. कर्पे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





