९ मे रोजी निनादेवी क्रीडा मंडळ पन्हळे राजापूर आयोजित पन्हळे येथे कबड्डी चा रणसंग्राम

निनादेवी क्रीडा मंडळ, पन्हळे यांच्या वतीने दिनांक ९ मे २०२६ रोजी पन्हाळे तर्फ सौंदळ येथे ग्रामीण पंचक्रोशी मर्यादित भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “आई निनादेवी चषक २०२६” अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांना राज्यस्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकांसह उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी इच्छुक संघांनी आपली नोंदणी ७ मे २०२६ पर्यंत करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. परिसरातील सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी, असे आवाहन निनादेवी क्रीडा मंडळ पन्हळे यांनी केले आहे.
📞 संपर्क:
ऋषिकेश राणे – 89838 04013
प्राजल कदम – 70200 50267
संदीप ताम्हणकर – 8530778183





