आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रमोद जठार यांचे 7 मे रोजी जिल्ह्यात भव्य स्वागत होणार!

जिल्ह्याभरात स्वागत सोहळ्याची जय्यत तयारी

प्रत्येक तालुक्यात होणार भाजपकडून स्वागत

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर ७ व ८ मे रोजी ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते आठही तालुक्यांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. प्रमोद जठार यांच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपाकडून करण्यात आली आहे.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे दि. ७ मे सकाळी १० वा. दोडामार्ग भाजपा कार्यालय, सकाळी ११:३० वा. सावंतवाडी भाजपा कार्यालय, दुपारी १ वा. वेंगुर्ला भाजपा कार्यालय, सायंकाळी ४ वा. कुडाळ भाजपा कार्यालय, सायंकाळी ६ वा. मालवण भाजपा कार्यालय. त्यानंतर राखीव. दि. ८ मे सकाळी १०:३० वा. देवगड भाजपा कार्यालय, सकाळी ११:३० वा. पडेल भाजपा कार्यालय, दुपारी १ वा. वैभववाडी भाजपा कार्यालय, सायंकाळी ३:३० वा. कणकवली ग्रामीण भाजपा कार्यालय, सायंकाळी ५ वा. कणकवली शहर भाजपा कार्यालय, सायंकाळी ६:३० वा. तळेरे गावाच्या वतीने सत्कार. या दौऱ्यान भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!