मालडी श्री भावई देवी मंदिरात 13 मे रोजी जीणोद्धार वर्धापन दिन सोहळा

श्री भावई देवी मंदिर, मालडी येथे जीणोद्धार वर्धापन दिन सोहळा १३ व १४ मे २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. सोहळा बुधवारपासून सुरू होणार असून सकाळी ९ वाजता अभिषेक व आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद यांचा कार्यक्रम पार पडेल. संध्याकाळी ग्रामस्थांच्या सुरेल भजनाने कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात येईल. रात्री ९ वाजता मामा मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाटक मंडळ, मोचेमाड, ता.वेंगुर्ला प्रस्तुत महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग दक्ष जन्म सादरीकरण केले जाईल.
सोहळ्याचा दुसरा दिवस गुरुवारी, १४ मे रोजी रंगमेळा कार्यक्रम (मालवण मेढा येथील) रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मालडी जल्लोष २०२६ हा कार्यक्रम पार पडेल, ज्यामध्ये मालडी आणि मुंबई येथील ग्रामस्थ सहभागी होतील.
मालडी ग्रामस्थांनी सर्वांना सहकार्य व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे.





