‘इतिहास कट्टा’ अंतर्गत ९ रोजी पावशीत छ. शिवरायांवर व्यख्यान

इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास कट्टा या कार्यक्रमांतर्गत ९ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पावशी येथील वाटवे मंगल कार्यालयात थोर इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती ईतिहास संकलन समितीचे जिल्हा कार्यवाह डॉ. कमलेश चव्हाण व शिवप्रेमीचे विवेक पंडित यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्याख्यानासाठी पालकांनी आपल्या मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे डॉ. कमलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विवेक पंडित, रमा नाईक, बंड्या सावंत उपस्थित होते.
डॉ. चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यत व्याखयन होणार आहेत. ९ मे रोजी दु. ३ वाजता पावशी येथे व्याख्यान होणार आहे. शिवाजी महाराजांची जीवन शैली आत्मसात करावी, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. व्याख्यानानंतर प्रश्न उत्तरांसाठी वेळ ठेवण्यात आला आहे. युद्धनीती, शिवाजी महाराजांनी आरमार दल कसे निर्माण केले या विषयावर व्याख्यन होणार आहे. असे विवेक पंडित यांनी सांगितले.

error: Content is protected !!