मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भाजपाच्या रायगड दक्षिण जिल्हा प्रभारी पदी निवड

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली निवड जाहीर
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री व भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांची रायगड दक्षिण च्या जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे हे राज्यभरात हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जात असून भाजपाचा हिंदुत्ववादी तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर श्री. राणे यांची रायगड दक्षिण जिल्ह्याच्या प्रभारी पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.





