भाजपाच्या प्रदेश प्रवक्तेपदी माजी आमदार प्रमोद जठार

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली नियुक्ती

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या प्रदेश प्रवक्ते पदी माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर प्रदेश प्रवक्ते पदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमोद जठार हे हजरजबाबी व्यक्तिमत्व म्हणून राजकारणात परिचित असून राजकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यातच भाजपाच्या व संघाच्या मुशी मध्ये वाढलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या साऱ्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 23 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर प्रमोद जठार यांना स्थान देण्यात आले आहे.

error: Content is protected !!