मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते समिती कणकवली विधानसभा अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली शिफारस

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबवण्यासाठी व या योजनेच्या सनियंत्रणासाठी कणकवली विधानसभा क्षेत्र स्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे. 16 सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समिती च्या अध्यक्षपदाची माळ मिलिंद मेस्त्री यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे. या मतदारसंघाचे आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री मेस्त्री यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मेस्त्री यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!